• SED banner 3
  • SED banner 4
  • SED banner 5
  • SED banner 1
shadow

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत!

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करताना ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करून घेणे, त्यांना शाळांमध्ये टिकवून ठेवणे व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध योजनांची अंमलबजावणीही त्याच तत्परतेने होण्याची गरज आहे. विद्यार्थी विकासाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती, शाळांसाठीच्या भौतिक सुविधा इ. ची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या विविध राज्यस्तरीय संचालनालयाची माहिती, त्यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध योजना या सर्वांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन आणि संचालनालयातर्फे वेळोवेळी घेतले जाणारे सर्व निर्णय, परिपत्रके शाळा, शिक्षक, प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत वेळेत पोहोचावेत, या हेतूने या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.

प्रशासन, अध्ययन, अध्यापन यामध्ये संगणकाचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याने विविध संगणक प्रणालींची निर्मिती करून त्या प्रणाली या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.

आपल्या सर्वांना या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास आहे.


 
श्री. देवेंद्र फडणवीस श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. विनोद तावडे श्री. विनोद तावडे
माननीय मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मा. श्रीमती अश्विनी भिडे (भा.प्र.से.) मा. श्रीमती अश्विनी भिडे (भा.प्र.से.)
सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मा. श्री. एस. चोक्कलिंगम (भा.प्र.से.) मा. श्री. एस. चोक्कलिंगम (भा.प्र.से.)
आयुक्त, शालेय शिक्षण विभाग
shadow mwnu